प्रयोगशील जॉन अब्राहम (व्हीडिओ)

Sakal 2021-04-28

Views 2

मुंबई - अभिनेता जॉन अब्राहम आता आपल्या करियरमध्ये बरेच प्रयोग करतो आहे. निर्माता म्हणून दोन चित्रपट करतानाच तो आपली प्रतिमा बदलण्याचाही प्रयत्न करतोय. एक यशस्वी अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी सरसावला आहे.
जॉनच्या लूक्‍सचे चाहते बरेच आहे. मात्र, आपल्या अभिनयाचा ठसा अद्याप त्याने तितकासा उमटवलेला नाही. मागच्या वर्षी आलेल्या फोर्स या चित्रपटामुळे जॉनचा आत्मविश्‍वास वाढला आहे. त्यामुळेच तो प्रयोगशील झाला आहे.
जाफना या चित्रपटात त्याने तसे प्रयोग केले आहेत. हा चित्रपट दक्षिण आशियातील दहशतवादी संघटना एलटीटीईवर आधारलेला आहे. त्यात जॉन दहशतवाद्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण श्रीलंकेत करण्यात येणार आहे. शुजित सरकार याचे दिग्दर्शन करणार असून जॉन स्वत: निर्माता असणार आहे. असाच एक वेगळा चित्रपट असेल, शूजित सरकार दिग्दर्शित विकी डोनर हा.
जाफना चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी जॉन श्रीलंकेतील काही शहरांना भेट देणार आहे. तसा, हा त्याचा दुसरा निगेटिव्ह रोल. यापूर्वी त्याने इंनिग्स शुटआऊमध्ये तशी भूमिका केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS