मुलींची छेड काढण्यात नागपूर अव्वल
अनेक बाबतीत राज्यात अव्वल असणारी राज्याची उपराजधानी आता छेडखानीच्या बाबतीतही अग्रेसर आहे. मुलींची छेड काढण्यात नागपूर शहर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर देशात नववा क्रमांक लागतो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या गृह खात्याच्या अहवालात असलेल्या आकडेवारीवरुन ही माहिती पुढे आली आहे.