रुग्णांची गैरसोय करून रुग्णालयात चित्रीकरण
मुंबई - शहरात मलेरियाने हाहाकार उडाला असताना आणि त्यातच शासकीय व पालिकेची रुग्णालये रुग्णांना कमी पडत असताना, परळच्या महात्मा गांधी रुग्णालयातील काही वॉर्ड जाहिराती; तसेच माहितीपटासाठी भाड्याने दिले जात आहेत. या रुग्णालयातील वॉर्ड चक्क आयडिया कंपनीच्या एका जाहिरातीसाठी आणि सरकारी माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी रिकामे करण्यात आले होते. त्यातील रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये कोंबण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे नातेवाईक संतप्त झाले होते. हा प्रकार आज घडला.