पुणे - नवीन वर्षाच्या प्रारंभी चार बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मराठी चित्रपटांमध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. "एकाच महिन्यात चार चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे प्रेक्षक विभागला जाऊन त्याचा तोटा मराठी चित्रपटसृष्टीला होईल,'' असे परखड मत झेंडा चित्रपटाचे दिग्दर्शक अवधूत गुप्ते याने "ई-सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.