पुणे : कॅम्प येथील १४० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन छत्रपती शिवाजी मार्केट येथील २५ दुकानांना मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत फिश मार्केट मधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहेत. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत काही कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे कॅन्टोन्मेंट, राज्य व केंद्र सरकारने नुकसानग्रस्त व्यापार्यांना मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते करीत आहेत.