इंदापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील भिगवण उपबाजार आवारातील मासळी बाजारांमध्ये गावरान ३१ किलोचा सिल्वर जातीचा मासा
विक्रीस आला. माऊली फिश मार्केटमध्ये झालेल्या लिलावात माशास प्रतिकिलो १७१ रुपये असा विक्री दर मिळाला असुन मच्छीमारास एकाच माशाच्या
विक्रीतुन पाच हजार तीनशे रुपये मिळाले. उत्तम भाव मिळाल्यामुळे मच्छिमारानेही समाधान व्यक्त केले.इंदापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचा भिगवण उपबाजार आवारातील मासळी बाजार हा जिल्ह्यासह राज्यामध्ये प्रसिध्द आहे. उजनी धरणांसह
परिसरातील धरणातील मासेही मच्छीमार येथे आवर्जुन विक्रीसाठी घेऊन येतात. वीर धरणांमध्ये मच्छीमारी करणारे मच्छीमार शिवनाथ परसाया यांना वीर
धरणांमध्ये मच्छीमार करत असताना गावरान सिल्वर जातीचा ३१ किलोचा मासा सापडला होता. भिगवण मासळी बाजाराची ख्याती विचारात घेऊन शिवनाथ
परसाया यांनी हा दुर्मिळ सिल्वर जातीचा मासा भिगवण मासळी बाजारातील माऊली नगरे यांच्या माऊली फिश मार्केट येथे विक्रीस आणला.