आज महाशिवरात्रीमुळे देशभरातील बँका बंद आहेत. उद्या शुक्रवार असला तरी देशभरातील अनेक बँकांचे कर्मचारी सोमवारी तसेच मंगळवारी संपावर जाणार असल्याने उद्या सुद्धा बँकांचे कामकाज सुरळीत होण्याचे चिन्हे नाहीत. येत्या शनिवारी आणि रविवारी बँकांना असलेली सुट्टी तसेच त्यानंतर लगेच असलेला संप यामुळे आता बँकांचे व्यवहार एक आठवडा खोळंबणार असल्याचे चित्र आहे.