महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून थरारक खेळांमध्येही कुठेही कमी नाहीत हे दाखवण्यासाठी काही तरुणींनी एक खास आव्हान स्वीकारत नऊवारी नेसून लोणावळ्यातील नागफणी सुळका सर केला आहे. विशेष म्हणजे अनेक ट्रेकर्सला खुणावणारा हा सुळका या महिलांनी नऊवारी साडीत अवघ्या सात मिनिटांमध्ये सर केला. पुण्यातील ‘इंडिया ट्रेक्स’ने महिला दिनानिमित्त हा अनोखा साहसी उपक्रम राबवला.
#InternationalWomensDay #Rappling #Trek #TrekinNauvari #IndiaTrekkers #Maharashtra #Pune #NagfaniSulka