रत्नागिरी : झुक झुक झुक झुक आगीन गाडी..... धुरांच्या रेषा हवेत काढी....... हे गाणं आजच्या आधुनिकीकरणात लुप्त होणार असच चित्र आहे. कोकण रेल मार्गांवर धावणाऱ्या गाडयांना जोडलेले डिझेल इंजिन लवकरच कालबाह्य होणार आहे. रोहा ते वेर्णा अशा या मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रत्नागिरी ते रोहा या मार्गावरील बहुतांशी काम आटोपले असून गाडी चालवण्यासाठी आवश्यक्य त्या चाचण्या करण्यास सुरुवात झाली आहे. डिझेल इंजिन चालवताना त्यातून बाहेर पडणारा धूर आणि त्यातून होणारे पर्यावरण प्रदूषण याला पर्याय काढला जात आहे. तो म्हणजे विद्युतीकरणाचा होय.
गेले चार दिवस रत्नागिरी ते रोहा मार्गांवर विजेवरील इंजिन चालवून चाचणी घेण्यात येणार असल्याची वार्ता येत होती. सगळ्यांनाच उत्सुकता होती. मुंबई मध्ये अशा गाड्या सर्वानीच पाहिल्यात. पण दऱ्या खोऱ्यातून जाणारा कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण हे एक आव्हान होते. ते पूर्ण करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सरसावले.
व्हिडीओ : राजेश कळंबटे