मुंबईतल्या एका वृद्ध रिक्षाचालक आजोबांचा त्याच्यां नातीच्या शिक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष सांगणारी पोस्ट अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. दोन तरुण मुलांच्या मृत्यूनंतर नातीच्या शिक्षणासाठी आर्थिक चणचण भासायला लागली, त्यामुळे तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःचं घर विकून रिक्षातच संसार मांडला. सोशल मीडियावर ही पोस्ट ज्यांनी कोणी वाचली त्यांनी आजोबांच्या हिंमतीला आणि त्यांच्या नातप्रेमाला सलाम ठोकला आणि मोठ्या दिलाने केली मदत.
#India #DeshRaj #Mumbai #AutoRickshaw