मुंबई मध्ये पुन्हा कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील काही महिन्यांपासून नियंत्रणामध्ये असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आता बीएमसीने मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझर वापरण्याचं आवाहन केले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या सध्या थेट रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.