कोरोनाग्रस्तांचा आकडा आटोक्यात आला असला तरी मुंबईत कोविड-19 च्या फिरत्या प्रयोगशाळा लॉन्च करण्यात आल्या आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एनएबीएल ॲक्रिडेटेड आणि आयसीएमआरची (ICMR) मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण करण्यात आले.