पुण्यातील वानवडी परिसरात एका तरुणीने केलेल्या आत्महत्येवरुन आता भाजपाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणी पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सत्य बाहेर काढले पाहिजे. तसेच हे प्रकरण दाबण्याचे काम पुणे पोलिसांनी करू नये, असं म्हटलं आहे.