दिल्लीत पेटलेल्या आंदोलनाच्या चर्चेची धग अजूनही कायम आहे. तर दुसरीकडे ‘शीख फॉर जस्टीस’ (SFJ) ही संघटनाही चर्चेत आली आहे. अचानक चर्चेत आलेल्या संघटनेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या संघटनेवर भारतात बंदी आहे. मात्र, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढू देण्याची मागणी या संघटनेनं केली होती. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसा झाली, तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असंही या संघटनेनं म्हटलं होतं. तेव्हापासून शीख फॉर जस्टीसच्या नावाची चर्चा सुरू झाली. तर आजच्या व्हिडीओ मधून जाणून घेऊया या संघटने विषयी थोडी माहिती.
#sikhforjustice #farmarprotest