हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. हर्षवर्धन जाधव यांना अटक केल्यानंतर त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं होती. यावेळी न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आता त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. बचाव पक्षाचे वकील झहिर खान पठाण यांनी याबाबत माहिती दिली.
#HarshvardhanJadhav #RaosahebDanve #Politics #Maharashtra