करोनावर नियंत्रण मिळवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं. स्थलांतरित मजुरांचे हाल झाले. करोनामध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. त्यामुळे या भ्रष्टाचारावर अधिवेशनात वाभाडे काढले जातील पण ते घेण्याची हिंमत सरकारने दाखवावी, असं आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिलं आहे.