#ChhathPuja2020 #ArvindKejriwal #ManojTiwari
छठ पुजेच्या मुद्द्यावरून दिल्लीमध्ये राजकारण चांगलेच पेटले आहे. समस्त उत्तर भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या छठ पुजेला कोरोनाचा वाढत्या आकड्यामुळे बंदी घालण्यात आली आहे. या मुद्दयावरून भाजप आणि अरविंद केजरीवाल सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. दिल्लीमध्ये उत्तर भारतीयांची असलेली संख्या पाहता विविध समित्यांच्या माध्यमातून छठपुजेचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाचा झालेला उद्रेक पाहता हा आकडा आणखी वाढू नये यासाठी केजरीवाल सरकारने काही निर्बंध घातले आहेत. हा बंदीचा निर्णय भाजपला पटलेला नसून मनोज तिवारी यांनी याबाबत ताशेरे ओढले आहेत. एकीकडे कोरोनाचे रूग्ण वाढत असताना केजरीवाल सरकारने हॉटस्पॉट असलेल्या जागी लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का असा प्रश्न दिल्लीकरांना पडला आहे.