गेल्या पाच सहा दिवसांपासून भिंगार मध्ये निर्जळी असल्याने नागरिक त्रस्त झालं;ए आहेत. याबाबत कॅंटोन्मेंट अधिकाऱ्यांनी मात्र कोणताच खुलासा केला नाही. भिंगारचा पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडलेला आहे. सदेव पक्षीयांनी आणि लोकप्रतिनिधींनी यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यास म्हणावे तसे यश आले नाही. विळद भागात नगर -मनमाड रस्त्यालगत असलेली मुख्य जलवाहिनी नेहमी फुटत असल्याने ते महत्वाचे कारण पुढे केले जात आहे. काही वेळा घटना खरी असते तर काही वेळा माहिती संशयाद्स्पद असते. कॅंटोन्मेंट चे अधिकारी पाणी प्रश्नी नेमकी माहित देत नाहीत. खा. सुजय विखे देखील हतबल झाल्याने त्यांनी थेट संसदेत आवाज उठवला होता. त्यानंतर दिवसाआड पाणी मिळत होते. आता पुन्हा पाच दिवसापासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे.