व्हॅलेंटार्इन डे निमिटाने प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो सध्या जाती अाणि धर्माच्या बेगडी अस्मितेमुळे समाज मने दुगंभली गेली आहे प्रेम जिव्हाळयाचे माध्यमातून समाजाला एकरुप ठेवण्याकरिता अाणि शेतकऱ्यांच्या फुलांना यामुळे निर्यातक्षम बाजारपेठ निर्माण व्हावी या उद्देशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकारातून पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर गुडलक चौक ते शेतकरी महाविद्यालय चौक यादरम्यान ‘प्रेमयात्रा काढण्यात आली यावेळी अभिनेते प्रवीण तरडे, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दैनिक दिव्य मराठीच्या ‘मौन सोडू चला बोलु’ प्रतिज्ञेची शपथ सर्वांना दिली