दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आपचे आमदार कपिल मिश्रा यांना बुधवारी भर दिल्ली विधानसभेत मारहाण करण्यात आली. लोकशाहीच्या पवित्र मंदिरातच आपचे आमदार कपिल मिश्रा यांच्यावर तुटून पडले. वृत्तवाहिनीवरील दृश्यांमध्ये काही आमदारांनी कपिला मिश्रा यांचा गळा पकडला होता तर, काही त्यांना लाथ मारत असल्याचे दिसत होते.